पर्यटनाशी निगडित व्यवसायांच्या नोंदणी शुल्कात ५०% सवलत

0
93

कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गोवा सरकारने पर्यटन क्षेत्राशी निगडित विविध प्रकारचे व्यवसाय करणार्‍यांना नोंदण शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासंबंधीचा आदेश पर्यटन खात्याने काढला आहे. याचा फायदा ‘सी’ व ‘डी’ श्रेणीतील हॉटेल्स व होम स्टे, तसेच डिलर्स व ट्रॅव्हल एजंट्‌स, टूर ऑपरेर्टस, जलक्रीडा आयोजक, खासगी जमिनीतील शॅक्स व हट्‌स, छायाचित्रकार, टुरिस्ट गाईडस्, डेकबेड्‌स व अंब्रेला यांची सोय करणारे हॉटेलियर्स व बेरोजगार युवक, सासी क्रीडांचे आयोजक, मसाला बागायतदार आदींना २०२१-२२ ह्या वर्षासाठी नोंदणी व नोंदणीचे नुतनीकरण करताना ५० टक्के एवढी सवलत मिळणार आहे. त्यापैकी ज्या कोणी यापूर्वीच नोंदणी अथवा त्याच्या नुतनीकरणासाठी पूर्ण शुल्क भरलेले आहे त्यांना पुढील नोंदणीच्यावेळी पन्नास टक्के सवलत देण्यात येईल.