अरुणाचल प्रदेशमध्ये भारत-चीन संघर्षानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पहिल्याच राज्याच्या दौर्यावर आहेत. सियांग येथे राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संबोधित केले. यावेळी भारताला युद्ध नको आहे; परंतु जर युद्ध आमच्यावर लादले गेले, तर आम्ही कोणत्याही आव्हानाला आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत, असे ते म्हणाले.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) ने बांधलेल्या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी ते येथे आले होते. भारत कधीही युद्धाला प्रोत्साहन देत नाही. आम्हाला आमच्या शेजार्यांशी नेहमी सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. हा वारसा आम्हाला भगवान राम आणि बुद्ध यांच्याकडून मिळाला आहे, असेही ते म्हणाले. यावेळी राजनाथ सिंह यांनी ‘हे युद्धाचे युग नाही’ या पंतप्रधान मोदींच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.