देशात नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या ५ वर

0
6

देशात एक्सबीबी व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. गुजरातमध्ये एक नवीन रुग्ण आढळला आहे. यासोबतच अमेरिकेत धुमाकूळ घालणार्‍या एक्सबीबी.१.५ सब व्हेरियंटच्या भारतातील रुग्णांचा आकडा पाचवर पोहोचला आहे. सध्या देशात कोरोनाच्या या व्हेरियंटचे गुजरातमध्येतीन रुग्ण आढळले असून, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळला आहे.

दुसर्‍या बाजूला देशात काल १३२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, सक्रिय रुग्णांची संख्या २,५८२ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या ५,३०,७०७ इतकी झाली आहे.