यावेळीही मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार : श्रीपाद नाईक

0
136

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचा आपण विकास साधला असून विकासकामे करीत असल्यानेच मतदारांनी आतापर्यंत आपणाला चारवेळा निवडून आणले, असे उत्तर गोवा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार श्रीपाद नाईक यानी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची काल सांगता झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळीही मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

विरोधी कॉंग्रेस पक्षाने आपण निष्क्रिय खासदार असल्याचा आरोप केला आहे, असे सांगून नाईक म्हणाले की मी केलेला विकास लोकांसमोर आहे. ‘इंडिया टुडे’ व ‘टाईम्स ऑफ इंडिया’ ने केलेल्या सर्वेक्षणात उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ विकासाच्याबाबतीत अव्वल असल्याचे म्हटले आहे. ‘इंडिया टुडे’ने प्रसिध्द केलेल्या विकासाच्याबाबतीत उत्कृष्ट ठरलेल्या १०० लोकसभा मतदारसंघात उत्तर गोव्याचा समावेश होता, असे सांगून आपण केलेल्या विकासकामांसाठी आपणाला कॉंगे्रस पक्षाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे नाईक म्हणाले.

माझे काम पाहूनच जनतेने मला चार वेळा निवडून आणले. पहिल्या निवडणुकीत ३८ हजारांची आघाडी, दुसर्‍या निवडणुकीत ५८ हजारांची आघाडी, तिसर्‍या निवडणुकीत सर्व विरोधक एकवटल्याने ७ हजारांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. तर चौथ्या निवडणुकीत एक लाख सहा हजार मतांची आघाडी मिळाल्याचे नाईक यांनी सांगितले. यंदाही मतांची मोठी आघाडी मिळणार असल्याचा विश्‍वास त्यानी व्यक्त केला.