>> राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा
गोव्याच्या यश पाडलोस्करने त्रिवेंद्रम-केरळ येथे झालेल्या ६१व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ३ पोझिशन ५० मी. प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले. स्पर्धेतील सुवर्ण पदक हरियाणाच्या निशांत दलाल (११३७ गुण), तर रौप्य पदक पंजाबच्या फतेह सिंगला (११३४ गुण) प्राप्त झाले. या यशामुळे यशी वरिष्ठ भारतीय संघाच्या निवड चाचणीसाठी निवड झाली आहे.