यंदा इफ्फीचे आयोजन १५ जानेवारीपासून शक्य

0
271

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) येत्या १५ जानेवारी ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान आयोजित केला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
गोवा मनोरंजन संस्थेच्या एका बैठकीनंतर बोलताना फळदेसाई यांनी वरील माहिती दिली. या महोत्सवाचे उद्घाटन आणि समारोप सोहळा कला अकादमीच्या आवारात होणार आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.