म्हादईप्रश्‍नी साक्षीदाराची आकडेवारीच चुकीची

0
81

>> सुनावणीस जलसंसाधनमंत्र्यांची उपस्थिती

म्हादईप्रश्‍नी काल झालेल्या सुनावणीत कर्नाटकच साक्षीदाराची उलटतपासणी चालूच ठेवण्यात आली. यावेळी पाण्याची उपलब्धता, पडणारा पाऊस, पाण्याची आकडेवारी, याबाबत साक्षीदाराने पूर्णपणे तफावत व्यक्त करणारी उत्तरे दिली. त्याचा समाचार घेताना गोव्याचे आत्माराम नाडकर्णी यांनी कर्नाटकला उघडे पाडले.
जलसंसाधनमंत्र्यांची उपस्थिती
दरम्यान, या सुनावणीसाठी गोव्याचे जलसंसाधनमंत्री विनोद पालयेकर यांनी नवी दिल्ली येथे हजेरी लावली. यावेळी त्यांनी गोव्याच्या कायदा टीमचे अभिनंदन केले.
म्हादई लवादाचा कार्यकाल वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे यावेळी मंत्री पालयेकर यांनी यावेळी सांगितले. म्हादई प्रश्‍नी गोवा सर्वशक्तीनिशी लढा देणार असून त्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याचे मंत्री म्हणाले.
दरम्यान, ५ लाखांच्या मोबदल्यात कर्नाटकच्या बाजूने साक्ष देण्याचे व अहवाल तयार करण्याचे काम स्वीकारल्याचा खुलासाही साक्षीदार गोसाचीन यांनी उलटतपासणी दरम्यान केला.