म्हादईप्रश्‍नी तडजोड नाहीच ः मुख्यमंत्री

0
189

>> प्रसंगी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह मोदींना भेटणार

म्हादईप्रश्‍नी कोणतीही तडतोड केली जाणार नाही. कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. म्हादईप्रश्‍नी गरज भासल्यास सर्वपक्षीय शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची तयारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत म्हादईवरील एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना काल केले.
कर्नाटकाने बेकायदा म्हादईचे पाणी वळवले आहे. त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. ही अवमान याचिका येत्या १५-२० दिवसांत सुनावणीला येण्याची शक्यता आहे. न्यायालयात गोव्याची बाजू भक्कमपणे मांडली जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
म्हादई या विषयावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, विजय सरदेसाई, रोहन खंवटे, रवी नाईक, प्रसाद गावकर, जयेश साळगावकर, लुईझीन ङ्गालेरो, रामकृष्ण ढवळीकर, आलेक्स रेजिनाल्ड, विनोद पालयेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली.

म्हादई जीवनवाहिनी मला आईसमान आहे. म्हादईवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही. म्हादईच्या विषयावर राजकारण केले जात नाही. म्हादईचा विषय गंभीरपणे हाताळला जात आहे. राज्याच्या हिताचे संवर्धन केले जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
म्हादईप्रश्‍नी राज्याच्या हिताचे रक्षण केले जाणार आहे. म्हादईच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजुट दाखविण्याची गरज असल्याचे जलस्त्रोतमंत्री ङ्गिलीप नेरी रॉड्रीगीस यांनी सांगितले.
म्हादई विषयावर विरोधी पक्षाचा सरकारला पूर्ण पाठिंबा आहे. म्हादईवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही. म्हादईप्रश्‍नी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. या समितीची स्थापना करण्यात आली आहे का? असा प्रश्‍न दिगंबर कामत यांनी उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयात म्हादईप्रश्‍नी अवमान याचिका प्रलंबित आहे. या याचिकेवर तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

कर्नाटकने म्हादईनंतर आता खांडेपार नदीचे पाणी वळविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. खांडेपार नदीचे पाणी वळविल्यास दुधसागरावर विपरित परिमाण होणार आहे. तसेच ओपा येथील पाणी प्रकल्पाला पुरसे पाणी मिळणे कठीण होणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.