मोसमी पाऊस लांबणीवर

0
73

>>अरबी समुद्रात वादळाची स्थिती

 

काल दुपारपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला. वादळी पावसामुळे विविध भागांमध्ये पडझड झाली. राजधानी पणजी शहरातील रस्ते जलमय झाले होते. गटारांचे पाणी रस्त्यावर आल्याने. पादचार्‍यांना व दुचाकी चालकांची तारांबळ उडाली. वेध शाळेशी संपर्क झाला असता अरबी समुद्रात तुफानची स्थिती निर्माण झाल्याने मोसमी पाऊस आणखी दोन दिवस लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पावसाळ्यातील पुराची शक्यता लक्षात घेऊन कोणतीही नैसर्गिक आपत्ती कोसळल्यास त्यावर ताबडतोब नियंत्रण ठेवता यावे यासाठी पालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, वीज तसेच आपतकालिन व्यवस्थापन यंत्रणांना तत्पर ठेवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम पावसातही चालू आहे. अशा जागी पाणी निचरा व्यवस्था नसल्याने दुचाकी स्वारांची तारांबळ
उडाली.
कदंब बगल मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मेरशी जवळच्या भागात रुंदीकरणाचे काम चालू आहे. तेथील रस्त्यांना खड्डे पडून त्यात पाणी साचले असल्याने चारचाकी वाहनांनाही वाहतूक करणे कठीण होत आहे.