लोकप्रियतेच्या बाबतीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा तसेच जपानमधील लोकप्रिय नेते आणि पंतप्रधान शिंजो ऍबे यांनाही मागे टाकले आहे. ‘रिङ्गलेक्शन्स ऑन सर्व्हे ऑङ्ग ग्लोबल पर्सेप्शन्स ऑङ्ग इंटरनॅशनल लिडर्स अँड वर्ल्ड पॉवर’ नावाच्या अहवालात जगातील विविध नेत्यांच्या प्रभावाचा वेध घेण्यात आला आहे. देशातील तब्बल ८७.८ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना मान्य असल्याची मत व्यक्त केले असून मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा – ४४.८ टक्के , ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरून – ५१.५ टक्के आणि जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे – ३०.४ टक्के यांनाही मागे टाकले आहे.