मेहुली घोषला महिलांच्या १० मी. एअर रायफल्समध्ये सुवर्ण

0
119

>> १३वी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा

भारतीय नेमबाज मेहुली घोषने काठमांडूत सुरू असलेल्या १३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धात नेमबाजीत महिलांच्या १० मी. एअर रायफल प्रकारात सुवर्णवेध घेतला. मेहुलीची ही कामगिरी विक्रमी कामगिरी ठरली असती. परंतु दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेला आयएसएफएफची मान्यता नसल्यानी ती विश्वविक्रमासाठी ती ग्राह्य धरली जाणार नाही. भारताने सांघिक प्रकारातही सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

१९ वर्षीय मेहुलीने २५३.३ गुणांसह हे सुवर्णपदक मिळविले. जे विद्ममान विश्वविक्रमापेक्षा ०.४ गुणांनी जास्त होते. विद्ममान विश्वविक्रम भारताच्याच अपूर्वा चंदेलाच्या (२५३.९ गुण) नावावर आहे. भारताच्या श्रीयांका शदांगीने (२५०.८ गुण) रौप्य तर श्रेया अगरवालने (२२७.२ गुण) कांस्यपदक मिळविले.

पदकतक्त्यात भारत दुसर्‍या स्थानी
भारताने गेल्या दोन दिवसांत नेमबाजी, ऍथलेटिक्स व अन्य खेळांत प्रकारात १८ सुवर्ण, १६ रौप्य व ९ कांस्यपदके मिळवून एकूण ४३ पदके प्राप्त प्राप्त केली आहे. त्यात नेमबाजीतील ९ पदके (४ सुवर्ण, ४ रौप्य, १ कांस्य), ऍथलेटिक्समध्ये १० पदके (४ सुवर्ण, ४ रौप्य व २ कांस्य) समावेश आहे. व्हॉलीबॉलमध्ये भारताच्या दोन्ही पुरुष व महिला संघांनी सुवर्णपदके मिळविली. व्हॉलीबॉलमध्ये भारतीय पुरुष संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारताना २०-२५, २५-१५, २५-१७, २९-२७ अशी मात केली. उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. दरम्यान, महिलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात नेपाळचा पराभव करीत सुवर्णपदक प्राप्त केले. भारतीय महिलांनी अंतिम लढत २५-१७, २३-२५, २१-२५, २५-२०, १५-६ अशी जिंकली. श्रीलंकेला कांस्यपदक प्राप्त झाले.
तायक्वांदोत १ सुवर्ण व ३ कांस्य तर टेबल टेनिसमध्ये पुरुष व महिला संघांनी सुवर्ण कामगिरी केली आहे. भारत पदकतक्त्यात नेपाळनंतर (४४ पदके) दुसर्‍या स्थानी असून श्रीलंका ४६ पदकांसह तिसर्‍या स्थानी आहे.

भारतीय महिला फुटबॉल संघाकडून मालदीवचा धुव्वा
दरम्यान बाला देवीने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर भारतीय महिला फुटबॉल संघाने मालदीवचा ५-० असा धुव्वा उडवित पोखरण येथे सुरू असलेल्या १३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धात काल शानदार विजयी सलामी दिली. गोव्याच्या मायमोल रॉकी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या भारतीय संघाने स्पर्धेत दमदार सुरुवात केली. बाला देवी व्यतिरिक्त डांगमेई ग्रेस, मनिषा आणि जबामनी तुडू यांनी प्रत्येकी १ गोल नोंंदविला. पोखरण स्टेडियमवर झालेल्या या विजयामुळे भारतीय संघाने ३ गुणांची कमाई केली असून गुक्तक्त्यात अव्वल स्थान मिळविले आहे. भरतीय संघाचा पुढील सामना आता गुरुवार ५ डिसेंबर रोजी श्रीलंकन महिला संघाविरुद्ध होणार आहे.