‘मेफ्टल स्पा’ गोळ्यांबाबत सावधानतेचा इशारा

0
20

अंगदुखी, दातदुखी तसेच, काहीही बारीकसारीक शारीरिक त्रास जाणवला की सर्रास मेफ्टल स्पा या गोळ्यांचे सेवन केले जाते. वेदनाशामक (पेनकिलर) म्हणून वापरली जाणारी मेफ्टल स्पा प्रत्येक घरात असतेच. मेफ्टल स्पा औषधाच्या सेवनामुळे शारीरिक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्यांचे सेवन करू नये, असा सल्ला केंद्राने दिला आहे.
भारतीय फार्माकोपिया कमिशन (आयपीसी) ने मेफ्टल संदर्भात औषध आणि सुरक्षेबाबतचा इशारा दिला आहे. मेफ्टलमध्ये असलेले मेफेनामिक ॲसिड आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कालांतराने या औषधामुळे गंभीर दुष्परिणामांचाही सामना करावा लागू शकतो. मेफ्टलच्या सेवनाने इओसिनोफिलिया आणि सिस्टीमिक लक्षणे सिंड्रोम सुद्धा होऊ शकतो.