मेघालयात भाजपचा ‘एकला चलो’चा निर्णय

0
13

मेघालय विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ईशान्येकडील या राज्यात 27 फेब्रुवारीला मतदान होणार असून 2 मार्चला निकाल लागणार आहे. मेघालयमध्ये भाजपने एकला चलो रे चे धोरण स्वीकारले आहे. मेघालयमध्ये स्थानिक राजकीय पक्षांचे वर्चस्व आहे. तरीही भाजपने या निवडणुकीत एकला चलोची भूमिका घेतली आहे. भाजपला मेघालयमधील नॅशनल पीपल्स पार्टीकडून खूप आशा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि एनपीपीने युती करून राज्यात सरकार स्थापन केले होते. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत भाजपने केवळ दोन जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेसने 21 जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत भाजपाने 47 जागांवर निवडणूक लढवली होती. निवडणूक निकालानंतर भाजपने एपीपीशी युती केली. कोनराड संगमा हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. भाजपाला दोन जागा मिळूनही सरकारमध्ये बसण्याची संधी मिळाली. सध्या दोन्ही पक्षांमध्ये अनेक मुद्द्यांवरून वाद सुरू आहे.