मुंबईत मुसळधार पावसाने दाणादाण उडवली असून नालासोपारा येथील नेवाळे ते देसाईवाडी भागातील चार जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. यांपैकी तिघांचे मृतदेह सापडले असून चौथ्याचा शोध जारी आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरील विमानसेवा कोलमडली. दिवसभरात १०८ विमाने रद्द करण्यात आली तर ५१ अन्यत्र वळवण्यात आली. रेलसेवेवरही परिणाम झाला.