- डॉ. सुरज स. पाटलेकर (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय)
अर्श हा काढुन टाकणे हा शेवटचा पर्याय असु शकतो व आयुर्वेदामध्येही औषध, क्षार, अग्नीकर्म व शस्त्रकर्म ह्या अर्शाच्या ४ प्रकारच्या चिकित्सेचा उल्लेख मिळतो. लेप, रक्तमोक्षण, अवगाह, धूम, अभ्यंग, स्वेद, बस्ती इत्यादी व काही योगासनेसुद्धा उपयुक्त ठरतात.
मुळव्याधी म्हणजेच पाईल्स किंवा हीमोरॉईड्स. अर्श(संस्कृत), बवासीर (हिन्दीमध्ये), बीक, मोड येणे अश्या नावानेही ओळखले जाते. गुदद्वाराच्या(एनस)आतील (सभोवताल आतमध्ये) व बाहेरच्या भागातील ङ्गुगलेल्या व सुजलेल्या दुखणार्या रक्तवाहिन्यांना(रक्तवाहिन्या बाहेर येतात) मुळव्याध असे म्हणतात. अर्शाचे दुखणे, पीडा एवढी भयानक असते की ती एखाद्या शत्रुप्रमाणे प्राणाचा नाश पण करु शकते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. अर्श या शब्दाने केवळ गुदाच्या ठिकाणी निर्माण होणारे मांसांकुर (गुदार्श) असाच अर्थ अपेक्षित आहे (गुद म्हणजे ज्या ठिकाणाहून मलविसर्जनाची क्रिया घडते. त्याचेही भाग आहेत. ते मलाचे धारणसुद्धा करते व ते एक मर्म आहे- जेथे मार लागल्यास मरण येऊ शकते असे). अन्य ठिकाणी उत्पन्न होणार्या मांसांकुरानाही अर्श असे म्हटले जरी गेले तरी त्या त्या अवयवाचे नाव मागे जोडले जाते. उदा. नासार्श, कर्णार्श इत्यादी.
अर्शामध्ये दोन प्रकार आहेत – विनारक्तस्राव व रक्तस्रावासहित. अर्शामुळे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्राव झाल्यास रक्त कमतरता (एनिमिया) निर्माण होते. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग संग्रहणी हा रोग पण होऊ शकतो. या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण भारतात तरी नव्याने तयार होत असतात. काही काळापूर्वी मुळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता १८ ते २५ या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मुळव्याध होऊ लागली आहे. दरवर्षी २० नोव्हेंबर हा दिवस जगभर जागतिक मुळव्याध दिन म्हणून साजरा होत असतो. हा रोग कोणालाही सहजपणे होतो.
सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, (दारु पिणे, धूम्रपान, अंमली पदार्थ इ.), वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे(चणे,वाटाणे,बटाटा इ.), अतितिखट पदार्थ सेवन, चुकीची आहार पध्दती (ङ्गास्ट ङ्गुड व कमी ङ्गायबर युक्त आहाराचे सेवन, पिझ्झा- पनीर- चीस-बटर-नुडल्स-चिप्स, मैद्याचे पदार्थ, इड्ली, डोसा, समोसा, वड़ा, भजी, पाव, ब्रेड सारखे पचायला जड असे पदार्थ अतिप्रमाणात खाणे); अतिमांसाहार (विशेषत: बीङ्ग, पोर्क, तंदूर, चिकन, मटन इ.) जास्त मात्रेमध्ये खाण्याने मुळव्याध होऊ शकतो. असे लक्षात येईल की वरील उल्लेखित हे सर्व पदार्थ पचन बिघडवणारे आहेत आणि अर्श हा पचनसंस्थेशी सम्बंधीतच व्याधी आहे.
अति प्रमाणात व्यवाय करणे(शारिरीक सम्बंध ठेवणे), वाहन अतिवेगात चालवणे (अति वेगवान वाहनातून प्रवास करणे), कठिन-असमान अश्या आसनावर खुप वेळ बसणे, सतत बैठे काम (बराच काळ एका जागी बसून राहणे), सतत उभे राहणे किंवा उभे राहून काम करणे, साईकलसारखी वाहने अति प्रमाणात चालवणे, उकीडवे बसणे, गुदभागी मार लागणे (शस्त्रक्रिया, दगड इत्यादिने), गुदभागी अतीशीत जलाचा स्पर्श होणे (पोहणे, आंघोळ, मलविसर्जन करुन स्वच्छ करतेवेळेस इ.), कडक मलप्रवृत्ती, मलावरोध/बद्धकोष्ठता- शौचविधीच्या वेळेस जोर करणे(पोट साङ्ग न होणे), नैसर्गिक वेगांचा अवरोध करणे किंवा ते होऊ न देणे(मल, मुत्र, अधोवायु इ.यांचे वेग हे आपण एखाद्या कामात असो किंवा कामाच्या जागी, तेव्हा आपण शक्यतो टाळतो किंवा राहीलेले काम पुर्ण करुनच आपण ते विसर्जित करु असा आपला अट्टाहास असतो, जाण्यास कंटाळा आलेला असतो, वेळच्यावेळी शौचास न जाणे इत्यादी), मुद्दामुन वेगांचे उदीरण करणे किंवा आणणे, सतत कुंथणे(मल वेगाचे प्रवाहण करणे), रात्रिचे अतीजागरण, दिवसा झोपणे, व्यायामाचा अभाव पण अतिव्यायाम केल्याने सुद्धा (वजनदार व जड वस्तु उचल्ल्याने), ताप-अतिसार (हगवण, मल पातळ होणे)-सुज येणे-पांडु इतर रोगांमुळे शरीर बारीक होणे, स्त्रियांच्यामध्ये गर्भपात, गर्भस्राव, गर्भप्रपीडन, गर्भधारणेदरम्यान (गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे बद्धकोष्ठता होते), प्रसूतीनंतर (प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते), रक्तदोष/रक्तवाहिन्यांचे आजार, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य सारख्या कारणांनी अर्शाची उत्पत्ति होते. काहिना जन्मत:च असतात तर काही बीज दुष्टी किंवा आईने गर्भिणी अवस्थेत केलेले अपथ्यामुळे पण अर्श होतो.
अर्शाच्या पुर्वरुपामध्ये (म्हणजेच प्रमुख लक्षणे व्यक्त होण्यापूर्वीच्या अवस्थेमध्ये) खाल्लेले अन्न व्यवस्थित पचन न होणे, भुख न लागणे, पोट ङ्गुगणे, पोटात गुडगुड आवाज येणे, पोटाचा रोग झाला असे वाटणे, अशक्तपणा येणे, शरीराचे बळ कमी होणे, भरपुर ढेकर येणे, मलप्रवृत्ति अल्प प्रमाणात होणे, शरीराचा भार कमी होणे, पोटर्या दुखणे व घट्ट झाल्यासारखे वाटणे, गुडघे दुखणे, चक्कर येणे, डोळयाभोवती सुज येणे, शौचास पातळ होणे किंवा घट्ट होणे, लघवीला जास्त होणे, घश्याशी जळजळणे, आंबट येणे, डोकेदुखी, पाठदुखी, आळस येणे, तहान लागणे, खोकला येणे, श्वासोश्वासला त्रास होणे, झापड येणे, त्वचा थोड्या प्रमाणात निस्तेज होणे, काही वेळा गुद-द्वाराच्या रक्तवाहिन्या ङ्गुगतात-सुजतात व त्या ठिकाणी वेदना होते व कधीकधी रक्तस्राव देखील होतो यासारखी लक्षणे दिसतात.
प्रमुख लक्षणांमध्ये रोगी वरील सर्व लक्षणांमुळे कृश/ किड्किडित/ बारीक होतो, शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना व भडक लाल रंगाचे रक्त पडणे(रक्तस्रावसहित अर्शामध्येच), आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान पोटामध्ये वेदना होणे, गुदभागी खाज, गुदातून चिकट पदार्थ येणे-आव पडणे, गुदभागी गाठ/मोड/कोम्ब सारखी आल्याने काहितरी आहे असे सतत जाणवत राहणे, रक्तस्राव झाल्यामुळे शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊन ऍनिमिया सारखी अवस्था येणे,भुख मंदावते, शौच विधिच्या वेळेस गुदभागी वेदना व रक्तस्राव होतो या कारणामूळे रुग्ण जेवण कमी करु लागतो व वजन ही कमी होते. त्रास अजुनच वाढु लागतात. सततच्या त्रासामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो.
कंबर, जांघेमध्ये तीव्र वेदना, शिंका येणे, छातीमध्ये दुखणे, तोंडाला चव नसणे, कानात चित्रविचित्र आवाज येणे, मलाच्या गाठी होणे-अल्प प्रमाणात होणे व थोडा ङ्गेसाळ व थोडा चिकट असणे, त्वचा-नख-डोळे-मुख व मल हे किंचित काळपट रंगाचे होणे, थंड पदार्थ सहन न होणे व किंचित कोमट पदार्थ खाणे, पिणे सुख:कर वाटणे ही काही वातदोषामुळे झालेल्या अर्शाचि लक्षणे आहेत.
पित्तामुळे अर्श हे दुर्गंधीत असतात, कुठलाही स्पर्श सहन न होणारे(उष्ण पदार्थ तर नकोशे वाटु लागतात), थंड पदार्थांची इच्छा होते, तीव्र पीडा असणे, संपूर्ण शरिराला दाह/ जळजळ होणे, ताप, अधिक घाम येणे, उचक्या लागणे, चक्कर येणे,त्वचा-नख-डोळे-मुख-हे किंचित पिवळसर रंगाचे असते. मल हे पिवळसर व थोड़े रक्तवर्णाचे असते.
कङ्गामध्ये गुद, बस्ति, नाभिप्रदेशी मंद वेदना होणे, मुखातुन लाळ गळणे, सर्दी होणे(नाकातुन पाणी येणे), लघवीला त्रास होणे, डोके जड होणे, उलटी होणे किंवा मळमळणे, अधिक प्रमाणात कुंथल्यानंतर थोडीशी मलप्रवृत्ति होणे, त्वचा-नख-डोळे-मुख-दन्त हे थोड़े स़ङ्गेद वाटतील. कोमट पदार्थ सुख:कर वाटु लागतात
रक्तार्शामध्ये जवळपास सगळीच लक्षणे ही पित्ताचीच असतात पण रक्तस्राव(उष्ण) मात्र जास्त असतो व त्यामुळे रुग्णाचा वर्ण बेडकाप्रमाणे पांढरा ङ्गटक पांडुवर्णाचा दिसु लागतो. ग्रथित मलामुळे गुदप्रदेशी व आत व्रण/जखम होऊ शकते. श्वास घ्यायला त्रास होणे, हृत्स्पन्दन, चक्कर येणे, झापड येणे, झोप न लागणे, मानसिक दौर्बल्य ही लक्षणे दिसतात
असेच २ किंवा ३ दोष एकत्र आल्याने जे अर्श होतात त्यात त्यांची एकत्रित लक्षणे असतात.
आयुर्वेदामध्ये वर्णित दोषांच्या प्रमाणानुसार(कमी, अधिक) अर्शामधिल लक्षणे बदलत जातात.
– रंग काळा, नीळा, किंचित पीवळा, लाल, राखाडी, स़ङ्गेद असू शकतो.
– ते स्पर्शास कठिन, कोरडे, खरखरित, मऊ, कोमल, चिकट, काटेरी(काट्यांनी/कंटकांनी आच्छादिल्याप्रमाणे) असतात.
– एक व अनेक, वेगवेगळया आकाराचे(खर्जुर-कापुस-बोराच्या बी प्रमाणे, जळुच्या मुखाप्रमाणे,पोपटाच्या जीभेप्रमाणे, गाईच्या स्तन व ़ङ्गणसाच्या अठळी प्रमाणे),आखूड, एकत्रित आलेले किंवा एकामेकांपासुन अलग, लहान, मोठे, एक प्रकारचा उंचवटा असलेले, टोकदार, भेगा/चिर पडलेले असतात.
ह्या अर्शाची वेळेत जर चिकित्सा केली गेली नाही तर घोर व भयानक उपद्रव होऊ शकतात जसे की गुदभ्रंश(रेक्टल प्रोलॅप्स); भगन्दर(ङ्गिस्ट्युला); कावीळ(जॉन्डीस); पांडु(ऍनिमिया), यकृत वृद्धि(हीपॅटोमॅगेली) सारखे इतर.
मूळव्याधीचे प्रकार अवस्थेनुसार : मूळव्याधीचा आजार किती बळावलेला आहे त्यानुसार त्याचे ४ अवस्था मध्ये वर्गीकरण केले जाते.
प्रथम अवस्था – जेव्हा गुदभागी अल्पप्रमाणात वेदना, खाज व आग होते. तेव्हा त्यास प्रथम अवस्था असे म्हणतात. या अवस्थेत मूळव्याधीचा उपचार केल्यास औषधोपचाराने मूळव्याधी पूर्ण बरी होऊ शकते.
व्दितीय अवस्था- जेव्हा प्रथम अवस्थेतील गुदभागी वेदना, खाज व आग ही लक्षणे वाढतात. तसेच बद्धकोष्ठता- पोट साङ्ग न होणे गुदाच्या ठिकाणी कोम्ब आल्यासारखे जाणवणे. रक्तस्रावचे प्रमाण प्रथम अवस्थेपेक्षा वाढते तेव्हा त्यास व्दितीय अवस्था असे म्हणतात. यामध्ये मूळव्याधीचे कोम्ब शौच विधीच्या वेळेस गुदव्दाराच्या बाहेर येतात व शौच विधीच्या नंतर ते बाहेर आलेले कोम्ब आपोआप आत जातात. या अवस्थेत मूळव्याधीचा उपचार व पथ्यपालन केल्यास औषधोपचाराने मुळव्याधी पूर्ण बरी होते.
तृतीय अवस्था- बद्धकोष्ठता, शौचाच्या वेळी त्रास, रक्तस्राव,दाह, खाज ही लक्षणे व्दितीय अवस्थेपेक्षा वाढतात. या अवस्थेमध्ये शौच विधीच्या वेळेस गुदव्दाराच्या बाहेर आलेले मुळव्याधीचे कोम्ब आपोआप आत जात नाहीत, ते तसेच गुदव्दाराच्या बाहेर राहते, कोम्बाला बोटांनी आत ढकल्ल्या नंतरच कोम्ब आत जातो. या अवस्थेत मूळव्याधीचा उपचार व पथ्यपालन केले तरिही काही रुग्णांमधे औषधोपचाराने मूळव्याध बरे होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे या अवस्थेत शल्यचिकित्सा म्हणजेच ऑपरेशन करावे लागू शकते.
चतुर्थ अवस्था- चतुर्थ अवस्थेत तृतीय अवस्थेतील लक्षणे वाढतात. ही गंभीर अवस्था आहे, या अवस्थेत उपचारास विलंब करु नये. यामध्ये शौच विधीच्या वेळेस गुदव्दाराच्या बाहेर आलेले मूळव्याधीचा कोम्ब आपोआप आत जात नाही, तसेच तो बोटांनी ढकलून सुद्धा आत जात नाही ते तसेच गुदव्दाराच्या बाहेर राहतात. या चतुर्थ अवस्थेत मूळव्याधीचा उपचार ङ्गक्त शल्यचिकित्सेव्दारेच होऊ शकतो.
ज्या गोष्टी खाल्ल्याने, प्यायल्याने, केल्याने त्रास होतो किंवा अर्श होऊ शकतो त्या टाळाव्यात. अवस्थेनुसारच चिकित्सा करणे महत्वाचे व तेही तज्ञ चिकित्सकाकडुनच. जेवणामध्ये जुने तांदूळ, जव, गाईचे तुप, सुरण, पडवळ, आवळा, ताजे ताक, लोणी ह्या गोष्टी पथ्य आहेत पण चिकित्सकाच्या सल्ल्यानेच त्यांची मात्रा, काळ इतर ठरवावे कारण एखादी गोष्ट पथ्य म्हटल्यावर आपण दिवसरात्र तेच खाणे पसंत करतो व खातो जे चुकिचे आहे व मग काही त्रास झाल्यास चिकित्सकाला दोषी ठरवितो. हा रोग अनेक दिवस लपविला जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात. अर्शाची अवस्था ठरवायला ते परीक्षण करुनच पाहणे महत्वाचे. त्यासोबत अजुनही इतर रोग असू शकतात जे तुम्ही पाहु शकत नाही पण चिकित्सक प्रोक्टोस्कोपी, डीजीटल परीक्षण इ. द्वारे ते करू शकतो. ऍलोपॅथीमध्ये स्क्लेरोथेरपी (इन्जेक्शन ट्रीटमेंट), रबरबँड लायगेशन, क्रायोसर्जरी, इन्ङ्ग्रारेड कोऍगुलेशन, शस्त्रक्रिया
(हीमोरॉयडेक्टोमी), लेजर सर्जरी हे उपचार आहेत. पण प्रत्येक बिघडलेली गोष्ट काढुन टाकली म्हणजे होत नाही. ती सुधारावी लागते व ते आयुर्वेदानुसारच शक्य आहे. जर पचनशक्ती बिघडलेली असेल तर ती पुर्ववत केली पहिजे. अर्श हा काढुन टाकणे हा शेवटचा पर्याय असु शकतो व आयुर्वेदामध्ये पण औषध, क्षार, अग्नीकर्म व शस्त्रकर्म ह्या अर्शाच्या ४ प्रकारच्या चिकित्सेचा उल्लेख मिळतो. लेप, रक्तमोक्षण, अवगाह, धूम, अभ्यंग, स्वेद, बस्ती इत्यादी व काही योगासने सुद्धा उपयुक्त ठरतात.