मुलाच्या लैंगिक छळ प्रकरणी प्रशिक्षकाला अटक

0
15

उत्तर गोव्यातील स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणार्‍या एका १५ वर्षांच्या मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी महिला व बाल विभाग पोलिसांनी प्रशिक्षकाला काल अटक केली. गोवा महिला पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ आणि गोवा बाल कायद्याखाली सदर प्रशिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या नावाखाली नोव्हेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ या काळात लैंगिक छळ करण्यात आला, असे तक्रारीत म्हटले आहे.

सदर स्वयंघोषित प्रशिक्षकाकडे स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दाखला नसल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. योग शिक्षण देण्याच्या नावाखाली प्रशिक्षण वर्ग सुरू करून त्या ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. महिला व बाल विभाग पोलिसांनी त्या प्रशिक्षकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.