>> एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया यांचा सल्ला
देशात कोरोना विषाणूमुळे बर्याच शाळा अद्याप उघडण्यात आलेल्या नाहीत. अशातच एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी शाळा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. तिसर्या लाटेचा मुलांना धोका असतानाही डॉ. गुलेरिया यांनी पुन्हा शाळा सुरू करण्यासाठी विशेष रणनीती तयार करण्याचीही सूचना केली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे तेथे शाळा पुन्हा सुरू करता येतील. राज्य सरकारने विशेष रणनीती आखून शाळा पुन्हा सुरू कराव्यात असे डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे.
डॉ. गुलेरिया यांनी, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे फार कमी आहेत तेथे शाळा सुरू करण्यासाठी विचार झाला पाहिजे, असे सांगून फार कमी मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्याकडील बर्याच मुलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली आहे. बर्याच मुलांमध्ये विषाणूशी लढण्यासाठी नैसर्गिक प्रतिकारशक्तीदेखील तयार झाली असल्याचे म्हटले आहे.