अमर नाईक खूनप्रकरणी मुख्य संशयिताला लवकरच अटक

0
119

>> वास्को पोलिसांची माहिती, आरोपी दुबईत

अमर नाईक याच्या हत्येचे षड्‌यंत्र रचणारा मुख्य संशयित आरोपी अमरच्या प्रेयसीचा भाऊ हा दुबईत असून त्याच्या पासपोर्टची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच मुख्य संशयिताला दुबईतून गोव्यात आणण्यासाठी पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांकडे संपर्क साधला आहे.

नवेवाडे वास्को येथील अमर नाईकच्या खूनप्रकरणी सुपारी देणार्‍या अमरच्या प्रेयसीच्या भावाला दुबईतमधून अटक करण्यासाठी गोवा पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांशी संपर्क साधल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना गजाआड केले आहे. या गुन्ह्यामध्ये प्रेयसीच्या भावाने अमर नाईक याच्या खुनाची सुपारी दिली असल्याचे उघड झाले. अमर नाईकच्या प्रेयसीचा हा भाऊ सध्या दुबईत आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अमरच्या प्रेयसीच्या भावाच्या पासपोर्टची माहिती मिळवली आहे. त्याची माहिती केंद्रीय यंत्रणांना दिली आहे. या यंत्रणांमार्फत त्याला दुबईत अटक होण्याची शक्यता आहे.

अमरचे आपल्या बहिणीशी असलेले संबंध मान्य नसल्याने या संशयिताने आपला उत्तर प्रदेशमध्ये राहणारा मित्र रवीशंकर यादव याला ५ लाखांची सुपारी देऊन हा खून केला होता. या प्रकरणात या पूर्वी वास्को पोलिसांनी रविशंकर यांच्यासह एकूण दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी सर्व संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.