मुरगाव नगरपालिका अभियंत्याची बदली

0
115

>> विनयभंगाचा आरोप

मुरगाव नगरपालिकेत एका महिला कर्मचार्‍याचा विनय भंगाचा आरोपाखाली पालिका अभियंत्याची तडकाफडकी बदली करण्यात आली.
मुरगाव पालिकेत सुडा अंतर्गत येणार्‍या विविध योजनांच्या प्रसाराचे काम एका महिलेकडून करण्यात येते. तसेच तिच्या वेतनाची शिफारस पालिका अभियंतामार्फत केली जाते. गेल्या काही महिन्यांचे वेतन त्या महिला कर्मचार्‍याला मिळाले नव्हते. त्याविषयी तिने पालिका अभियंत्याकडे विचारणा केली असता जर तुला वेतन हवे असेल तर तुला माझ्याबरोबर यावे लागेल अशी अट तिला घातली. या प्रकरणी तिने पालिकेतील इतर महिला कर्मचार्‍यांनाही सांगितले. हे प्रकरण माजी नगराध्यक्षा तारा केरकर यांच्याकडेही गेले. त्यांनी संबंधित पालिका अभियंत्या विरोधात पालिका संचालनालयाकडे तक्रार करण्याची सूचना केली. त्यानुसार त्या महिलेने तक्रार केली असता पालिका संचालनालयाच्या एका चौकशी समितीने बुधवारी पालिकेत येऊन चौकशी केली असता पालिका अभियंता दोषी आढळला त्यामुळे त्याची तडकाफडकी बदली करण्यात आली.