मुरगावात सकाळी वर्दळ… सायंकाळी रस्ते निर्मनुष्य!

0
134

मुरगाव तालुक्यात २४ जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र काल रस्त्यावर लोकांची वर्दळ दिसत होती. दुपारी बारा वाजल्यापासून वास्को, दाबोळी, कुठ्ठाळी भागातील रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात आढळली. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर सायंकाळी येथील रस्ते मात्र निर्मनुष्य दिसत होते. वास्को गोवा शिपयार्ड जवळ पोलिसांनी नाकाबंदी केली होती. सडा, जेटी, बोगदा, एमपीटी कॉलनी परिसरातील नागरिकांनी टाळेबंदीला बर्‍यापैकी प्रतिसाद दिला. सायंकाळी रस्त्यावर लोक कमी दिसत होते.