मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अधिकार्यांशी होस्पेट – तिनई घाट ते वास्को पर्यंतच्या रेल्वे मार्गाबाबत काल चर्चा केली.
या रेल्वे मार्गाच्या विस्ताराचा प्रस्ताव विचाराधीन आहे. रेल्वे मार्गाच्या विस्तारासाठी वन विभागातील हजारो झाडांची कत्तल करावी लागणार आहे.
राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत रेल्वे मार्गाच्या विस्ताराच्या प्रश्नावर चर्चा झाली. झाडांच्या कत्तलीबाबत अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी रेल्वेच्या अधिकार्यांशी चर्चा केली आहे.
यावेळी वीज मंत्री नीलेश काब्राल, वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो, मुख्य सचिव परिमल रॉय, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.