मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोनापावल येथील राजभवनावर जाऊन राज्यपाल मलिक यांची काल संध्याकाळी भेट घेतली. याभेटीबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. या भेटीत राज्यातील कोरोना विषाणू रोखण्यासंबंधी उपाय योजनांबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे.
सरकारच्या कोविड १९ च्या पार्श्वभूमीवरील घरोघरी जाऊन सामुदायिक आरोग्य सर्वेक्षणाला कॉँग्रेस, गोवा फॉरवर्ड यांनी विरोध दर्शविला असून आरोग्य सर्वेक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे. विदेशातील जहाजांवरील खलाशांचा विषय उपस्थित केला आहे. या सर्वेक्षणामुळे राज्यात कोरोनाचा फैलाव होण्याची संशय या दोन्ही पक्षांकडून व्यक्त केला जात आहे. या आरोग्य सर्वेक्षणासाठी ७ हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचा वापर केला जाणार आहे.