>> विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे जर सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दिवस तुर्तास कमी करण्याचा विचार करीत असेल तर आमचे त्यांना पूर्ण सहकार्य असेल. मात्र, अधिवेशनाचे जेवढे दिवस असतील तेवढे दिवस कामकाज घ्यावेच लागेल. त्यामुळे मुख्यमंत्री आजारपणातून बरे होऊन परतले की अधिवेशन घेण्याचा सरकारला विचार करावा लागेल, असे विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांनी काल सांगितले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दीर्घकालीन अधिवेशन होय. त्यामुळे ह्या अधिवेशनात मांडण्यात येणार्या प्रश्नांची संख्याही जास्त असते. त्यामुळे ह्या प्रश्नांवर चर्चा होऊन उत्तरे मिळणे बंधनकारक आहे. ह्या पार्श्वभूमीवर सरकारने तुर्तास जरी अधिवेशन तीनच दिवसांचे घेतले तरी एकदा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती सुधारली की उर्वरीत दिवसांचे अधिवेशन घेता येईल, ते म्हणाले.