मुख्यमंत्री तातडीने दिल्लीस रवाना

0
274

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नवी दिल्लीला काल तातडीने रवाना झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत राज्यातील प्रलंबित खनिज प्रश्‍न, म्हादई व इतर महत्त्वाच्या विषयांवर या भेटीत चर्चा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. सावंत कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याबाहेर गेले नव्हते. सहा महिन्यांनंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री नवी दिल्लीच्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तसेच, प्रमुख केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन गोव्यातील विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. दरम्यान, बुधवारी बोलाविलेल्या महत्त्वपूर्ण बैठका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.