मुख्यमंत्रिपद सोडताच हेमंत सोरेन यांना अटक

0
6

>> जमीन घोटाळ्यात ईडीची कारवाई; चंपई सोरेन बनणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री

कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने काल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. अटकेपूर्वी हेमंत सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता चंपई सोरेन हे नवीन मुख्यमंत्री असतील. काल झालेल्या आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आलेी. चंपई सोरेन हे हेमंत सोरेन यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची काल ईडीकडून प्रदीर्घ चौकशी करण्यात आली. काल रात्री हेमंत सोरेन यांनी राजभवन गाठून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर ईडीने त्यांना अटक करून आपल्या कार्यालयात नेले. त्यांना नरजकैदेत ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
जमीन घोटाळ्यात हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या शक्यतेमुळे त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र कुटुंबातूनच विरोधाचा आवाज उठला होता. परिणामी झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष, काँग्रेस आणि राजद विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत चंपई सोरेन यांची नेतेपदी निवड करण्यात आली. ते लवकरच शपथ घेतील.