मुख्तार अब्बास नक्वी यांना तुरुंगवास : जामीन मंजूर

0
91

निवडणूक आचार संहिता उल्लंघन प्रकरण
भाजपचे नेते मुख्तार अब्बास नकवी यांना काल रामपूर येथील सत्र न्यायालयाने २००९च्या निवडणूक आचार संहिता उल्लंघनप्रकरणी एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली व त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला. मात्र नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. यामुळे नकबी यांची खासदारकी शाबूत राहणार आहे.२००९च्या लोकसभा निवडणुकांवेळी प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन त्यांच्याकडून झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. वरील न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी मनिषकुमार यांनी वरील प्रकरणी नकवी यांना विविध कलमांखाली दोशी ठरविले. त्यांच्यासह अन्य १८ जणांनाही दोषी ठरविण्यात आले होते.
रामपूर लोकसभा मतदारसंघातील पटवाई येथे नकवी यांच्या नेतृत्वाखालील निदर्शनांप्रकरणी नक्वी व भाजपच्या इतर कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता. रामपूर भाजप प्रमुखांच्या अटकेविरुध्द ही निदर्शने प्रतिबंधात्मक आदेश डावलून करण्यात आले होते व निदर्शक पोलीस स्थानकात घुसले होते.