मुखपाक (Stomatitis)

0
297
  • डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर (श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव)

 

लहान अबोल बालकांमध्ये जर मुखपाक झाला तर तो सर्वात जास्त त्रासदायक असतो, कारण लहान बाळ ह्या अवस्थेमध्ये  बोलता येत नसल्याने ङ्गक्त रडत राहतात व त्रास होत असल्याने पाणीसुद्धा पिऊ शकत नाहीत.

 

 

ह्या व्याधीलाच आयुर्वेदामध्ये सर्वसर असेही म्हणतात. सर्वसर म्हणजेच संपूर्ण मुखाची दुष्टी ज्यामध्ये घडते किंवा सर्व मुखाला व्याप्त असणारा असा हा रोग. मुखातील आतील श्लैश्मीक कलेला आतुन सुज येते. तरीही मुखातील सप्तांगांपैकी जे अंग सर्वात जास्त प्रभावित होतात ते म्हणजे ओठ व गाल यांचा आतील भाग, हिरड्या व जीभ.

मुखपाक मध्ये मुखाच्या आतल्या बाजूला लालसरपणा वाढून लहान-मोठे एक किंवा अनेक लाल- पिवळ्या इत्यादी रंगाचे ङ्गोड येतात व ते ङ्गुटुन तेथे मग घाव, व्रण/अल्सर (व्रणाच्या कडा लाल व मध्यभाग पिवळसर) होतो आणि रक्तस्राव (कमी मात्रेत) चालु होतो. एखाद्या वेळेस तेथे पूयसुद्धा होऊ शकतो.

मुखामध्ये उष्णता वाढते (मुखातील पित्त व रक्त हे दुष्ट होतात व व्याधि उत्पन्न करतात). दाह, जळजळ जाणवते. असे वाटु लागते की मुखातुन गरम वाङ्गा निघत आहेत. व्रण झाल्यास त्या ठिकाणी अतितीव्र व असह्य वेदना असतात. वेदना कमी-जास्त स्वरूपाच्या असतात. वेदना जास्त असल्यास एवढया प्रमाणात की मुखाच्या हालचालीसुद्धा खुप त्रासदायक असतात. मुख उघडता येत नसल्याने, नीट बोलता पण येत नाही, व्यवस्थित जेवता येत नाही, कोमट किंवा गरम जिन्नस खाल्ल्याने, गरम पाणी प्यायल्याने त्रास अजुनच बळावतात, वाढतात. कधी कधी थंड पदार्थांचा मुखामध्ये स्पर्श पण असह्य वाटु लागतो. ओठ हे कोरडे होतात, जिभेवरसुद्धा लहान ङ्गोड येतात- जीभ जड होते-त्यावर भेगा पडतात. चव कडु होते किंवा लागते. किंचित वेळा मधुर रसाची चवही लागते. सतत लाळ वाहते.

रक्तधातु व पित्तदोष यांची दुष्टी करणार्‍या आहार -विहाराने मुखपाक होतो. जसे की तिखट (मिरची इ.), आंबट (लोणचे इ.) आणि खारट (मिठ इ.) चवीचे पदार्थांचे अत्यधिक सेवन, स्वभावाने उष्ण अथवा अति उष्ण/गरम पदार्थ खाणे (माशांमध्ये झिंगे/प्रॉन्स, खेकडे, शिंपल्यातिल मांस, ब्रॉयलर चिकन अति प्रमाणात इ.)  वा पिणे (मद्यसेवन इ.), तसेच धुम्रपान, तंबाखु-गुटखा सेवन (शक्यतो ओठांच्या आतील बाजुस जेथे हे जास्त वेळ ठेवले जाते), अंमली पदार्थ(ड्रग्स), कारबोनेटेड ड्रिंक्स (शीतपेय), बडिशेप- सुपारी (एकेरी किंवा पान सहीत, त्या टोकदार असल्यामुळे मुखामध्ये आतील बाजुस इजा होऊ शकते. तसेच टूथब्रशने (जोरात किंवा पुन: पुनः दात स्वच्छ करण्यासाठी वापरल्याने), दाताचा एखादा तुकडा तुटल्याने त्याचा राहिलेला टोकदार भाग सतत मुखातील श्लैश्मीक कलेच्या (म्युकस मेम्ब्रेनच्या) संपर्कात येऊन घर्षण झाल्याने, आघात झाल्याने (बोलताना किंवा अन्नाचा घास चावत असताना, गालाचा आतील भाग वरील व खालील दातांच्या पंक्तिच्यामध्ये आल्याने), डेंटल ब्रेसीस वापरल्याने (त्यांची व्यवस्थित काळजी जर घेतली गेली नाही- योग्यवेळी काढले गेले नाहीत, योग्यवेळी दंतचिकित्सकास दाखविले गेले नाही तर), दन्तांची शस्त्रक्रिया (रूट कॅ नल, डेंटल इम्प्लांटेशन इ.) करतेवेळीसुद्धा इजा पोहोचु शकते व त्यामुळे मुखपाक होण्याची शक्यता असते.

मुखपाक हे एखाद्या व्याधीमुळे (बेक्टेरियल इनङ्गेक्शन; हरपिस सिम्प्लेक्स- व्हायरल इन्ङ्गेक्शन इ.), खाण्याच्या पदार्थांची ऍलर्जी (स्ट्रोबेरी, कॉ़ङ्गी, चॉकलेट, अण्डे, आंबट ङ्गळे/सायट्रस ङ्ग्रूट्स), रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने, मानसिक तणावामुळे, रात्री जागरण केल्याने, औषधांच्या  अति मात्रेमध्ये वापर केल्याने किंवा साईड इङ्गेक्ट्समुळे), जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे (विटामीन डेङ्गीसीएनसी- बी१२, ङ्गॉलिक ऍसिड, आयर्न, झिंक इ.)सुद्धा होऊ शकते.

लहान अबोल बालकांमध्ये जर मुखपाक झाला तर तो सर्वात जास्त त्रासदायक असतो, कारण लहान बाळ ह्या अवस्थेमध्ये  बोलता येत नसल्याने ङ्गक्त रडत राहतात व त्रास होत असल्याने पाणीसुद्धा पिऊ शकत नाहीत. अश्यातच त्यांना डिहायड्रेशन होते.

आयुर्वेदाप्रमाणे निदान परीवर्जन हेच सर्वात योग्य आहे- म्हणजेच ज्या गोष्टींपासुन मुखपाक झाला असेल त्या गोष्टी करणे, खाणे व पिणे टाळावेत, त्यांचा त्याग करावा. लक्षणे अधिक तीव्र असल्यास त्वरित वैद्यांना दाखवावे व चिकित्सा प्रारंभ करावी. घरघुती उपचार करुन विलंब करु नये. मुखधावन करणे  शक्यतो टाळावे (टूथब्रशमुळे जर इजा झाल्यास ते अजुनही कठीण होऊन बसेल) व करणे झाल्यास (औषधी द्रव्याच्या काढ्याने) सावधतेने करावे. गण्डूष (औषधी द्रव्य नाकातुन व मुखातुन स्राव होईपर्यंत किंवा कण्ठ दोषांनी/कङ्गाने भरेपर्यंत मुखामध्ये धारण करुन ठेवावे- न ङ्गिरविता; व नंतर सावकाश थुंकुन टाकावे), कवल(औषधी द्रव्य नाकातुन व मुखातुन स्राव होईपर्यंत किंवा कण्ठ दोषांनी/कङ्गाने भरेपर्यंत मुखामध्ये धारण करुन आतल्या आत ङ्गिरवावे व नंतर सावकाश थुंकुन टाकावे), मृदुविरेचन (रक्त व पित्त दोषांच्या शोधनाकरिता), औषधी द्रव्यांचे प्रतिसारण (मुखाच्या आतुन व्रणावर किंवा मुखातील दूषित व प्रभावित जागी लेप करणे), नस्य (नाकामध्ये औषधीद्रव्यांचे तैलाचे योग्यमात्रेमध्ये थेंब टाकणे),  रक्तमोक्षण सारख्या आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णित शोधन व शमन क्रिया खुप उपयुक्त ठरतात.

आधुनिक शास्त्रामध्ये ज्या गोष्टीच्या कमतरतेमुळे (जीवनसत्व;  डिहायड्रेशनसाठी फ्लुइड्स इ.) मुखपाक झाला असेल ते शरीराला पुरवठा करणे सोईस्कर समजले जाते. अँटीबायोटिक्स (बेक्टेरियल इन्ङ्गेक्शन वर मात देण्यासाठी) व अँटीव्हायरल चिकित्सा (व्हायरल इन्ङ्गेक्शन वर मात देण्यासाठी) हे सुद्धा वापरले जातात.