मुंबईत महिलेची निर्घृण हत्या

0
11

वूडकटरने मृतदेहाचे तुकडे; कुकरमध्ये शिजवले

दिल्लीच्या श्रद्धा वालकर निर्घृण हत्याकांडानंतर मुंबईतील मीरारोड परिसरात तशाच प्रकाराची मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. मीरारोड येथे राहणाऱ्या मनोज साने (56) याने आपल्या लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य (32) हिची निर्घृण हत्या केली. तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वूडकटर मशिनच्या सहाय्याने तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे कुकरमध्ये शिजवले आणि मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी दुर्गंधी येत असल्याची तक्रार बुधवारी पोलिसांत दाखल केल्यायानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. साने याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मीरारोडच्या गीतनगरमधील गीता-आकाशदीप इमारतीच्या 7 व्या मजल्यावर मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे दोघे मागील 5 वर्षांपासून भाड्याच्या सदनिकेत रहात होते. बुधवारी संध्याकाळी त्याच्या घरातून दुर्गंधी येत असल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विकृत मनोजने सरस्वतीची हत्या 4 जून रोजी केली होती. हा नराधम सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट तब्बल तीन दिवस लावत होता. 4 जून रोजी सकाळच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यातून मनोजने सरस्वतीची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मनोजने झाड कापण्याची कटर मशीन घेऊन आला. सरस्वतीच्या संपूर्ण शरीराचे तुकडे तुकडे केले. त्याने सरस्वतीच्या शीराचेही कटर मशीनच्या मदतीने तुकडे केले. त्याने हाडे, मांस व रक्त वेगळे केले होते. यापैकी काही अवयव शिजवून त्याने कुत्र्यांनाही खाऊ घातले.

फ्लॅटच्या किचनजवळ बादल्या ठेवल्या होत्या. त्या पूर्णतः रक्ताने माखलेल्या होत्या. खोलीत मृत महिलेचे केस ठेवल्याचेही आढळले. विशेषतः अनेक प्रकारचे एअर फ्रेशनरही घटनास्थळी आढळले. या फ्रेशनर्सचा वापर दुर्गंधी आटोक्यात आणण्यासाठी केला जात होता. त्याला बुधवारीच अटक करण्यात आली. गुरुवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर केले असता, साने याला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावाण्यात आली.