मिताली राजकडे कर्णधारपद

0
124

वडोदरा येथे १२ ते १८ मार्च या कालावधीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या १५ सदस्यीय महिला संघाचे नेतृत्व मिताली राज हिच्याकडे सोपविण्यात आले आहे. तंदुरुस्तीच्या कारणास्तव प्रमुख वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिचा विचार करण्यात आलेला नाही. तिच्या जागी सुकन्या परिदा हिला निवडण्यात आले आहे. तीन सामन्यांची मालिका ही आयसीसीच्या महिला अजिंक्यपद (२०१७-२०२०) स्पर्धेचा भाग आहे. दक्षिण आफ्रिका दौर्‍यात भारतीय संघाने मितालीच्या नेतृत्वाखाली वनडे मालिका २-१ अशी तर हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदाखाली टी-२० मालिका ३-१ अशी जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली.

त्यामुळे याचा फायदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना संघाला होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १२ रोजी, दुसरा १५ रोजी व तिसरा १८ रोजी खेळविला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर टी-२० मालिका होणार आहे. यासाठी नंतर संघ जाहीर केला जाणार आहे.
भारतीय महिला संघ ः मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रिगीस, वेदा कृष्ममूर्ती, मोना मेश्राम, सुषमा वर्मा, एकता बिश्त, पूनम यादव, राजेश्‍वरी गायकवाड, शिखा पांडे, सुकन्या परिदा, पूजा वस्त्राकर व दीप्ती शर्मा.