मिकी पाशेको यांचा आमदारकीचा राजीनामा

0
101

गोवा विकास पक्षाचे सर्वेसर्वा व नुवेचे आमदार मिकी पाशेको यांनी काल आमदारकीचा राजीनामा दिला. तसेच गोवा विकास पक्ष सदस्यत्वाचा त्याग केला. दि. ३० रोजी सकाळी १० वाजता बेतालभाटी येथे गोवा सुराज पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार पाशेको यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून तो स्वीकारण्यात आला असल्याची माहिती राज्य विधानसभा सचिव एन. बी. सुभेदार यांनी दिली. भाजपा सरकार व त्यांच्या कारकिर्दीला जनता विटलेली आहे. गोव्याच्या हितासाठी धर्मनिरपेक्ष पक्षात जात आहे. यापुढे भाजपशी आपण संबंध ठेवणार नाही. समविचारी पक्षांशी युती करण्याचा विचार आहे. गोवा सुराज पक्षात प्रवेश केल्यानंतर पुढील कृती जाहीर करणार असल्याचे पाशेको यांनी सांगितले.
नुवेचे आमदार असलेले मिकी पाशेको भाजपा सरकारात मंत्री होती. वीज खात्याच्या अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर त्यांनी एप्रिल २०१५ मध्ये मंत्रिपद सोडावे लागले होते.