माहिती खात्याच्या संचालकपदी सुधीर केरकर यांची नियुक्ती

0
322

सरकारने एका आदेशाद्वारे माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या संचालिका मेघना शेटगावकर यांची बदली केली असून माहिती खात्याच्या संचालकपदी काल सुधीर केरकर यांची नियुक्ती केली आहे.

नवनियुक्त संचालक केरकर यांनी कालपासून पदभार स्वीकारला आहे. केरकर यांच्याकडे हस्तकला, वस्त्रोद्योग खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी बीजू नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांची सार्वजनिक बांधकाम खात्यात प्रशासकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंचवाडकर यांची बदली करण्याची मागणी मडगाव पालिका कर्मचारी संघटनेने केली होती.