माहिती आयुक्त निवडीच्या प्रकियेबाबत पुन्हा वाद शक्य

0
76

गेल्या दोन वर्षांच्या काळात राज्य माहिती आयुक्त पदांच्या नियुक्तीचा विषय वादग्रस्त बनला होता. आता सरकारने वरील दोन पदे भरण्यासाठी नव्याने प्रक्रिया सुरू केली आहे. दोन उमेदवरांपैकी एका उमेदवाराला कायद्याचे विस्तृत ज्ञान व अनुभव असणे आवश्यक असल्याचे जाहिरातीत नमूद केले आहे. परंतु एलएलबी पदवीच्या बाबतीत काहीही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी वरील पदे भरण्याचा दोन वेळा प्रयत्न झाला. ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी तांत्रिक मुद्यांवर आवाज उठविल्याने सरकारला वरीलपदे भरण्याची प्रक्रिया रद्द करावी लागली होती.
वरील पदावरील व्यक्तीस कायदा, विज्ञान व तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, मास मीडीया किंवा प्रशासन व शासन विषयांमध्ये अनुभव व ज्ञान असावे, असेही नमूद करण्यात आले आहे.