मासेमारीसाठी गेलेले दोघेजण केपेत बुडाले

0
26

मानगाळ केपे येथे मासेमारीसाठी गेलेल्या दोघा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सतीश पावटो गांवकर (३६) व भिसो पुरसो गांवकर (४३) अशी मयतांची नांवे आहेत. दोघेही नुने नेत्रावळी येथील नागरिक आहेत.

नुने नेत्रावळी येथून एकूण पाचजण मासेमारीसाठी किस्कोण मानगाळ येथे गेले होते. त्यातील दोघेजण ओहोळाच्या पाण्यात बुडाले. कुडचडे अग्निशामक दलाच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. केपे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.