राज्यात मागील २१ दिवसांत परराज्यातून १५३१ ट्रक मासळीची आयात करण्यात आली आहे. राज्यात आयात करण्यात येणार्या मासळीची पोळे आणि पत्रादेवी येथील तपासणी नाक्यांवर तपासणी केला जात आहे. आत्तापर्यंत मासळीमध्ये संशयास्पद काहीच आढळून आलेले नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.