माळीण दुर्घटनेतील मृतांची संख्या ७०

0
130

पुणे जिल्ह्याच्या माळीण गावातील डोंगरकडा दुर्घटनेतील मृतांची संख्या काल. ७० वर गेल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. प्रतिकुल हवामानाशी झुंज देत राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाचे जवान चिखल व दगडांच्या ढिगार्‍यांमधून लोकांचा शोध घेत आहेत. पुणे जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षातून दिलेल्या माहितीनुसार कालपर्यंत २५ पुरुष, २८ महिला व १० बालकांसह एकूण ६३ मृतदेह हाती लागले आहेत. जखमी स्थितीत सापडलेल्या आठजणांवर इस्पितळात उपचार चालू असल्याचे सांगण्यात आले. अजूनही चिखल व दगडांच्या ढिगार्‍यांखाली किमान १०० लोक दबलेल्या स्थितीत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.