मालमत्तेच्या वादातून पुतण्याकडून काकीचा खून

0
18

नेसाय-पाद्रीभाट येथे मालमत्तेच्या वादातून पुतण्याने काकीचा सुरा भोसकून खून केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. मालमत्तेच्या वादातून संशयित मारियो फर्नांडिस (34) याने काकी फ्लोरिना फर्नांडिस (53) हिचा सुरा भोसकून खून केला. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी 3 तासांत संशयिताला अटक केली.मारियो फर्नांडिस आणि फ्लोरिना फर्नांडिस या दोघांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू होता. त्या वादातून संतापलेल्या मारियो याने रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास फ्लोरिना हिच्यावर जीवघेणा हल्ला केला. हा प्रकार रोखण्यास गेलेला एक तरूण जखमी झाला. या हल्ल्यानंतर मारियोने घटनास्थळावरून पलायन केले. गंभीर जखमी अवस्थेत फ्लोरिना हिला हॉस्पिटलात नेले असता, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मायणा-कुडतरी पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर तीन तासांत पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या नेतृत्वात पोलिसांनी मारियोला अटक केली. कित्येक महिन्यांपासून फर्नांडिस कुटुंबात मालमत्तेच्या वाटणीवरून मोठा वाद सुरू होता.