मालपे-पेडणे येथील अपघातात एक ठार

0
118

मालपे पेडणे येथे रविवार दि. १४ रोजी रात्री उशिरा मारुती ओमनी व टोयोटा या दोन वाहनात झालेल्या अपघातात कणकवली, कलमठ (ता. सिंधुदुर्ग) येथील मनोज नाडकर्णी यांचा मृत्यू झाला.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कणकवली येथील मनोज माधव नाडकर्णी (५०) हे आपल्या भाड्याच्या मारुती ओमनीने (एम एच ०७ ३७०६) पर्यटकांना घेऊन गोव्यात आले होते. ते दि. १४ रोजी रात्री परत कणकवलीला निघाले असता रात्री ११.३० वा. विरुद्ध दिशेने टोयोटाला (जीए ०३ आर ७९९७) धडक बसली व मारुतीचे चालक मनोज हे गंभीर जखमी झाले. त्यांना म्हापशातील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच वाहनातील आणखी एक इसम जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला परस्पर मुंबईला उपचारासाठी नेले. त्यामुळे त्याचे नाव कळू शकले नाही. टोयोटा वाहनातील दोघांना किरकोळ जखम झाली असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज दिला आहे. पेडणे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.