मायकल लोबोंनी घेतली पणजीत सुदिन यांची भेट

0
39

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळातील वादग्रस्त मंत्री असलेल्या मायकल लोबो यांनी काल मगो पक्षाचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांची भेट घेतली. पणजीतील एका हॉटेलमध्ये या दोघांनी एकमेकांना भेटून चर्चा केली. मात्र ही अनौपचारिक अशी भेट होती व या बैठकीत राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे लोबो यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, आपण भाजपचे एक आमदार बाबूश मोन्सेरात व गोवा फॉरवर्डचे आमदार विनोद पालयेकर यांचीही भेट घेतली असल्याचे ढवळीकर यांनी यावेळी सांगितले.