‘माझो बीएलओ, म्हजो ईश्ट’ मोहिमेचा डिचोलीत शुभारंभ

0
137

पणजी
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. कुणाल आयएएस यांनी डिचोली मतदारसंघातील बुथ लेव्हल अधिकार्‍यांनी एसव्हीईईपीखाली आयोजित केलेल्या ‘माझो बीएलओ म्हजो ईश्ट’ या खास मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती, प्रसाद पानकर आदी यावेळी उपस्थित होते.
बीएलओ म्हणजे स्थानिक सरकारी व निमसरकारी अधिकारी असून स्थानिक मतदारांशी ते परिचित असतात त्याचप्रमाणे त्याच भागातील ते मतदार असतात आणि मतदार यादी अद्ययावत करण्यास साहाय्य करतात. मतदार बनण्यासाठी ते पात्र नागरिकांना सहाय्य करतात आणि मतदानकार्ड मिळवितात. बीएलओ मतदार यादीत नाव समाविष्ठ करण्यासाठी तसेच नाव वगळण्यास आणि मतदार यादीतील चुकींची दुरूस्ती करण्याचे अर्ज उपलब्ध करतात असे श्री. कुणाल यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलतानवा श्री. कुणाल यांनी, मतदार यादी निरोगी आणि स्वच्छ बनविण्यासाठी निवडणूक आयोग सर्व ते प्रयत्न करीत असल्याचे सांगितले व मतदार यादी निरोगी आणि स्वच्छ बनविण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्याचे आवाहन बीएलओना केले.
अधिकारी श्री. नावती यांनी बीएलओनी मतदारांची मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शन बनून काम करण्याची गरज व्यक्त केली आणि त्रुटीमुक्त मतदार यादी बनविण्याचे उद्दीष्ठ साधण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले.
शांतादुर्गा उच्च माध्यमिक शाळेच्या मुलांकडून सादर करण्यात आलेल्या फुगडी कार्यक्रमाने आणि बीएलओच्या नैतिक मतदान विषयावरील नाटकाने कार्यक्रमास सुरवात झाली. सीईओनी यावेळी माझो बीएलओ, म्हजो ईस्ट, या संकल्पनेवरील पेंटिंगचे प्रकाशन केले. यावेळी बीएलओना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. श्री. पानकर यांचेही यावेळी भाषण झाले.