माओवाद्यांच्या हल्ल्यात ९ जवान शहीद; ६ जखमी

0
100

नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात किस्तराम भागात घडवून आणलेल्या शक्तीशाली आयइडी स्फोटात काल सीआरपीएफचे ९ जवान शहीद झाले. तसेच या अतिरेकी हल्ल्यात सहा जवान जखमी झाले असून त्यापैकी चौघेजण गंभीर आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार काल सकाळी जवानांची तुकडी सकाळी ८ वा. या भागात टेहळणीवर होती. त्यावेळी उभयतांत चकमक झडली होती. नंतर दु. १२.३० वा. माओवाद्यांनी जवानांना लक्ष्य केले.

वरील भागातून सीआरपीएफची एक तुकडी जात असताना हा भीषण स्फोट घडविण्यात आल्यानंतर घटनास्थळीच ८ जवान शहीद झाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद शूर योध्द्यांना आपला सलाम अशा शब्दात आदरांजली व्यक्त केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री रमण सिंग यांनी या हल्ल्याचा धिक्कार केला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही तीव्र निषेध केला आहे.