मांद्रे उपसरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर

0
38

काही दिवसांपूर्वी मांद्रे पंचायतीचे सरपंच महेश कोनाडकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणून तो मंजूर झाल्याचा प्रकार घडल्यानंतर उपसरपंच चेतना पेडणेकर यांच्या विरोधात दाखल अविश्वास ठराव काल मंजूर झाला.

सरपंच अमित सावंत यांच्या नेतृत्वाखाली काल विशेष बैठक पंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीत उपसरपंच चेतना पेडणेकर यांच्यावर आणलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यात आली. मांद्रे पंचायतीत एकूण ११ पंच सदस्य असून, काल अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी उपसरपंच चेतना पेडणेकर, महेश कोनाडकर, राजेश मांजरेकर आणि संपदा आसगावकर हे चार पंच सदस्य गैरहजर राहिल्याने ७ विरुद्ध ० असा ठराव मंजूर झाला. चर्चेवेळी सरपंच अमित सावंत, तारा हडफडकर, प्रशांत नाईक, मैथिली फर्नांडिस, रॉबर्ट फर्नांडिस, मिंगेल फर्नांडिस, किरण सावंत आदी उपस्थित होते. आता उपसरपंच म्हणून तारा हडफडकर यांची निवड निश्चित झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मांद्रेचे सरपंच महेश कोनाडकर यांच्या विरोधात एकूण सात पंच सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. त्यावेळी त्या प्रकाराची मोठी चर्चा झाली होती.