मांडवीवरील तिसर्‍या पुलाबाबत चिंता नको

0
83

>> विरोधकांनी घेरल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

 

जीएसआयडीसीच्या सल्लागार संस्थांना सर्व कामांसाठी आतापर्यंत देण्यात आलेली शुल्क तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने करण्यासारखी कामेही जीएसआयडीसी का करते, या प्रश्‍नावर विरोधी आमदारांनी काल मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना फैलावर घेतले. या प्रश्‍नावरील ही चर्चा बरीच गाजली. सभापती अनंत शेट यांना सभागृहातील वातावरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.
आमदार रोहन खंवटे यांनी वरील मूळ प्रश्‍न विचारला होता. कन्सलंट ४८ कोटी ६१ लाख रुपये शुल्क दिल्याची माहिती मुख्यमंत्री पार्सेकर यांनी दिली. खंवटे यांच्या प्रश्‍नावरील चर्चा चालू असतानाच गुजरात येथे उड्डाण पुलाचे काम चालू असतानाच पूल कोसळला होता. तोच कन्सलंट मांडवी पुलाचेही काम करीत असल्याचे सांगून अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी कामाच्या दर्जाच्या बाबतीत संशय व भीती व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्री बरेच नाराज झाले. पुलाच्या कामाची तपासणी चेन्नैई येथील आयआयटी करीत आहे. त्यामुळे कुणीही चिंता करण्याचे कारण नाही, या पुलासाठी गंज येणार नाही, याची काळजी घेऊनच लोखंड वापरले जाते, असेही पार्सेकर यांनी स्पष्ट केले.