राज्य सरकारने राज्यातील सर्व कारखान्यांमध्ये महिलांना रात्रपाळीमध्ये काम करण्यास मंजुरी दिली आहे. कारखाने आणि बाष्पक खात्याच्या मुख्य निरीक्षकांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. राज्य सरकारने कारखाने कायदा, 1948 अंतर्गत संध्याकाळी 7 ते सकाळी 6 या वेळेत महिलांना काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी महिला कामगारांची लेखी संमती अनिवार्य आहे.