>> सरकार व शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागात शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्यता येणार आहेत. या बाबत काल महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना व त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला. १७ पासून शहरी भागातील इयत्ता आठवी ते दहावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीची शाळा सुरू करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी शाळा सुरू करणे शक्य आहे, तिथे मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू होतील.
शहरी भागात कोरोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार पालिका आयुक्तांना असतील, तर जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकार्यांनी घ्यायचा आहे. महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी खास समिती गठीत केली जाणार आहे. तसेच, नगरपंचायत, नगरपालिका, ग्रामपंचायत, स्तरावरही जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन होणार आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी निर्णय घ्यायचा आहे. तसेच सुधारित मार्गदर्शक सचूनानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेऊन व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय् घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकार्यांनी निर्णय घ्यायचा आहे. तसेच शाळा सुरू करण्याअगोदर कमीत कमी १ महिना संबंधित शहरात, गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांनी नियोजन करावे. पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे असे नियम घालण्यात आले आहेत.