महाराष्ट्रात महायुतीचे खातेवाटप अखेर जाहीर

0
12

भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीच्या महाराष्ट्रातील सरकारचे बहुचर्चित खातेवाटप अखेर शुक्रवारी जाहीर झाले. त्यानुसार अजित पवार यांनी अपेक्षेप्रमाणे अर्थ खाते पटकावले. धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते, तर हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खाते, छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालय, तर दिलीप वळसे पाटील यांना सहकार खाते देण्यात आले.