महाराष्ट्रात कडक निर्बंधांचा आरोग्यमंत्र्यांनी दिला इशारा

0
15

महाराष्ट्रात काल ३ हजार ९०० नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे यामुळे आरोग्य यंत्रणांची काळजी वाढली आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इशारा दिला आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असून लोकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे मंत्री टोपे यांनी निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात असा इशारा दिला आहे.

लसीकरणातही आपण थोडे मागे असून ते योग्य नाही असे सांगत आरोग्यमंत्र्यांनी ही टक्केवारी वाढवण्यासाठी आवाहन केले आहे. १०० टक्के लसीकरणाचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. एवढे दिवस रोज सक्रिय रुग्णांची संख्या ४०० ते ६०० असायची. पण आता २००० च्या पुढे पॉझिटिव्ह रुग्ण आढळतील अशी परिस्थिती आहे. मुंबईत रोज ५१ हजार चाचण्या केल्या जात आहे. त्यातून २२०० पॉझिटिव्ह येत असून चार टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे जो चांगला नाही. त्यामुळे आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला.