मल्लिकार्जुन खर्गेंना न्यायालयाचे समन्स

0
4

पंजाबच्या संगरूर न्यायालयाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना मानहानीच्या एका प्रकरणात समन्स बजावले आहे. संगरूरचे रहिवासी आणि हिंदू सुरक्षा परिषद व बजरंग दल हिंदचे संस्थापक हितेश भारद्वाज यांनी बजरंग दलाच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल दाखल केलेल्या याचिकेवर खर्गे यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश रमणदीप कौर यांच्या न्यायालयाने 10 जुलै रोजी हजर व्हा, असा समन्स बजावला आहे.