मराठी भाषकांना मारहाणीचे लोकसभेत तीव्र पडसाद

0
111

बेळगावच्या यळ्ळूर गावात मराठी भाषकांवरील पोलीस कारवाईचे तीव्र पडसाद काल लोकसभेत उमटले. शिवसेना सदस्यांनी या प्रकरणी जोरदार घोषणाबाजी करून सभागृह डोक्यावर घेतले. वादग्रस्त सीमाभागाचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्यात यावे, अशी त्यांची मागणी होती. शून्य तासाला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मराठी भाषकांवरील पोलिसांकडून झालेल्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त करून यात सुमारे ५० महिला व मुले जखमी झाल्याचे सांगितले. कर्नाटकने सीमाभागातील मराठी भाषकांवर नेहमीच अन्याय केल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकार असेच चालल्यास त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटू शकते असा इशारा त्यांनी दिला. यळ्ळूरमध्ये भराठी भाषकांनी मराठीत नामफलक लावल्यानंतर नव्याने वाद निर्माण झाला होता. कर्नाटक पोलिसांनी यावेळी महिलांसह अनेकांवर अमानूष लाठीमार केला होता व फलक तोडून टाकला होता.