‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांकडून मिल्खा सिंगच्या आठवणींना उजाळा

0
111

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी आपल्या ‘मन की बात’मध्ये देशवासीयांना उद्देशून ऑलिम्पिकशी संबंधित काही प्रश्न विचारले आणि भारताचे दिवंगत महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पंतप्रधान मोदी यांनी, मी यावेळी आपल्याला काही वेगळे प्रश्‍न विचारणार आहे असे सांगून ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण होता? ऑलिम्पिकच्या कोणत्या खेळात भारताने आतापर्यंत सर्वाधिक पदक जिंकले आहेत? ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? असे प्रश्‍न विचारले. यानंतर त्यांनी, मिल्खा सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला.

काही दिवसांपूर्वीच कोरोनाने त्यांना आपल्यापासून हिरावून घेतले. जेव्हा ते रूग्णालयात होते, तेव्हा मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती. ते रुग्णालयातही खेळाविषयी समर्पित व भावूक असल्याचे मला जाणवले. मिल्खा सिंग यांचे संपूर्ण कुटुंब खेळाला समर्पित होते असे मोदी म्हणाले.