‘मन की बात’मध्ये आता मोदीबरोबर ओबामा

0
146

या महिन्यातील पंतप्रधान मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रम विशेष असणार असून या कार्यक्रमात मोदींसमवेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हेदेखील सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम २७ रोजी प्रसारित केला जाणार आहे. स्वत: मोदी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या कार्यक्रमाद्वारे मोदी ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून भारतियांशी संवाद साधत असतात. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारत भेटीवर येत आहेत.